रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनच्या ओडेशा शहरातील वीजपुरवठा खंडित !

कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर चालू झालेले युद्ध अद्यापही चालू आहे. रशियाने ड्रोनद्वारे युक्रेनच्या ओडेशा शहरावर केलेल्या आक्रमणामुळे तेथील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. येथे १५ लाखांहून अधिक मनुष्यवस्ती आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा, तसेच अन्य मूलभूत गोष्टी मिळण्यास नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अन्य शहरांतील नागरिक ओडेशातील लोकांना भोजन पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘वीज पुरवठा पूर्ववत् होण्यास अनेक दिवस लागण्याची शक्यता आहे’, असे युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमिर झेलेंस्की यांनी सांगितले आहे.