किरीट सोमय्यांना जिवे मारण्याची धमकी

‘‘सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात घालणार सोमय्या’’ अशा शब्दांत धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती सोमय्या यांनी दिली.

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आणखी एका मंदिरांवर आक्रमण होण्याची शक्यता ! – हिंदु नेत्याची भीती

पाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित ! हवेलियन नगर येथे असलेल्या एका प्राचीन मंदिराला धोका आहे. या मंदिराच्या परिसरात एक अन्य प्राचीन ढाचा आहे. भू माफिया हा ढाचा तोडण्याची शक्यता आहे.

मास्क न घातल्याविषयी विचारणा केल्याने धर्मांधाकडून फ्रँकफर्ट (जर्मनी) विमानतळावर अल्लाहू अकबरच्या घोषणा देत पळण्याचा प्रयत्न !

‘आम्ही कोणत्याही नियमांचे पालन करणार नाही आणि आम्हाला कुणी विचारणा केली, तर आम्ही धार्मिक घोषणा देऊन घाबरवणार’, अशा मनोवृत्तीचे जगभरातील धर्मांध !

मेरठमध्ये गोहत्या रोखण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांचे प्राणघातक शस्त्रांद्वारे आक्रमण

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध कसायांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश ! हिंसक धर्मांध महिलांचा सामना करण्यासाठी हिंदू सिद्ध आहेत ?

अमेरिकेच्या संसदेजवळ बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह एकाला अटक

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधी सोहळा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अमेरिकेच्या संसदेजवळ एका व्यक्तील बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह अटक केली.

जोडवाडी (जिल्हा संभाजीनगर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या

निवडणुकीत हाणामारी, हत्या, पैसे वाटप, बनावट मतदान असे अनेक गुन्हे घडत असल्याने सध्याची लोकशाही निरर्थक ठरत आहे.

यावल (जिल्हा जळगाव) येथे अनधिकृत बांधकाम करणर्‍या मशीद ट्रस्टच्या विरोधात गुन्हा नोंद !

सर्वत्र फोफावलेल्या अनधिकृत मशिदींच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ! या मशिदींनंतर येथे धर्मांधांची वस्ती वाढते आणि नंतर हिंदूंना या भागातून पलायन करण्याची वेळ येते !

पोलिसांवर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक  

लोकशाहीचा पाया असलेली ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यात निवडणूक आयोग अपयशी झाला, असे समजायचे का ?

आंध्रप्रदेशामधील मंदिरांवरील आक्रमणाच्या प्रकरणी भाजप आणि तेलुगु देसम् यांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणासाठी हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या आंध्राचे पोलीस ! या घटनांची आता सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे !

८९ जणांना जामीन संमत; ठाणे न्यायालयाचा निर्णय

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल या दिवशी जमावाने केलेल्या आक्रमणात २ साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांची हत्या झाली होती. या प्रकरणी १६ जानेवारीला ठाणे न्यायालयाने ८९ जणांना जामीन संमत केला आहे.