प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक !

आतापर्यंत ४ जण अटकेत

कर्नाटक – भाजपच्या युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येप्रकरणी सद्दाम आणि हॅरिस अशा आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी शफीक आणि झाकीर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून वरील दोघांची नावे समोर आली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनीही सद्दम आणि हॅरिस यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे.

१ ऑगस्ट या दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते, ‘‘मारेकरी लवकरात लवकर पकडले जातील. २ – ३ दिवसांत हे प्रकरण अधिकृतपणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवले जाईल.’’

अटक करण्यात आलेल्या धर्मांधांच्या वडिलांचा कांगावा (म्हणे) ‘आम्ही मुसलमान आहोत; म्हणून आम्हाला लक्ष्य केले जात आहे !’

अटक करण्यात आलेल्या शफिकचे वडील इब्राहिम म्हणाले, ‘‘माझ्या मुलाला का अटक करण्यात आली आहे ?, हे मला माहीत नाही. आम्ही मुसलमान आहोत; म्हणून आम्हाला लक्ष्य केले जात आहे.’’