नरेल (बांगलादेश) येथील आक्रमणात सत्ताधारी अवामी लीग पक्षाच्या नेत्यांचा हात

‘व्हॉइस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्याने उघड केली माहिती

ढाका – बांगलादेशातील नरेल जिल्ह्यामध्ये १५ दिवसांपूर्वी झालेल्या हिंदूंवरील आक्रमणाचा एक व्हिडिओ ‘७१ टीव्हीज’ने प्रसारित केला आहे. हिंदु महिलांवर अत्याचार करणे हाच या आक्रमणामागचा मुख्य उद्देश असल्याचे या माध्यमातून उघड झाले आहे. अवामी लीगचे नेते शेख मसूदुझमन याने या आक्रमणाचे नेतृत्व केले होते, असे ट्वीट ‘व्हॉइस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून करण्यात आले आहे.

(बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या अवामी लीगचे नेतेच हिंदूंवर आक्रमण करतात. नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंना सुरक्षा पुरवण्यासाठी प्रयत्न करावा, हीच राष्ट्रनिष्ठ हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)