
गडचिरोली – भामरागड तालुक्यातील हिदूर-दोबूर मार्गावर माओवाद्यांचे लाल फलक झळकलेले दिसून आले, तसेच माओवाद्यांची पत्रकेही आढळून आली. माओवाद्यांनी २६ ते ३० जुलै या कालावधीत ‘गडचिरोली जिल्हा बंद’चे आवाहन या फलकांच्या माध्यमातून केले आहे. ‘जल, जंगल आणि जमीन’ या सूत्रांच्या विरोधात माओवाद्यांनी आंदोलन पुकारल्याचे या फलकांवरील लिखाणावरून उघड झाले. या भागात नवीन उद्योग येत आहेत, तसेच नवीन पोलीस ठाणी उघडली जात आहेत. यांवर माओवाद्यांचा आक्षेप आहे, असेही त्या लिखाणावरून दिसून येते. ठार झालेल्या माओवाद्यांच्या संदर्भातही या पत्रकात उल्लेख आहे.
पोलिसांनी या संदर्भात शोधमोहीम चालू केली आहे. ही पत्रके खरोखरच माओवाद्यांची आहेत का ?, हे पडताळून पाहिले जात आहे. येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. माओवाद संपुष्टात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येत होते. नुकतीच काही दिवसांपूर्वी केटापल्लीमध्ये मिळालेल्या पत्रकांच्या अनुषंगाने दोघांना पोलिसांनी अटक केली होती आणि ती माओवाद्यांची पत्रके नसल्याचे म्हटले होते.
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार