आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा डाव पोलिसांनी उधळला

६ महिलांना अटक

आझमगड (उत्तरप्रदेश) – येथील महाराजगंज येथील हिंदूंच्या वस्तीत वाढदिवसाच्या मेजवानीनिमित्त एकत्र आलेल्या हिंदूंना पैशांचे आमीष आणि भूतबाधेची भीती दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी ६ महिलांना अटक केली आहे.


महाराजगंज येथील हिंदूंच्या वस्तीमध्ये एका भाड्याच्या खोलीत रहाणार्‍या इंद्रकला नावाच्या महिलेने तिच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त ३० जुलै या दिवशी मेजवानीचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने त्या महिलेने शेजारच्या गावांतील अनुमाने १०० लोकांना बोलावले होते. तेथे जमलेल्या सर्वांना मिठाई आणि एक पुस्तक वाटण्यात आले. यासह त्यांना भूतबाधेची भीती दाखवून ती दूर करण्याविषयी सांगण्यात आले. इतकेच नव्हे, तर जमलेल्यांना पैशांचे आमीष दाखवून ख्रिस्ती धर्माचे महत्त्वही सांगून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्यात आले. याविषयी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाड घातली. पोलीस आल्याचे दिसताच काहींनी पळ काढला. या वेळी पोलिसांनी धार्मिक पुस्तके जप्त केली.

संपादकीय भूमिका

  • यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित होते ! हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही !
  • हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवरकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !