
वाशी – ‘वीर जवान फाऊंडेशन’च्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘कारगिल विजय दिवसा’निमित्त आयोजित करण्यात आलेला शौर्य, सन्मान आणि राष्ट्रभक्तीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला पद्मश्री पार्श्वगायक शंकर महादेवन, अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे ब्लॅक कॅट कमांडो कर्नल अभिषेक कुमार, मेजर इंद्रजीत सिंह, कर्नल रानडे, ‘वीर जवान फाऊंडेशन’चे संस्थापक विजय नाहटा (माजी सनदी अधिकारी), वीर जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश काकडे (निवृत्त, भारतीय सेना), शौर्यचक्र विजेते मधुसूदन सुर्वे (निवृत्त), तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, विरांगना, वीरमाता, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी आणि देशप्रेमी नागरिक उपस्थित होते. या वेळी १४ विरांगनांचा विशेष सन्मान करण्यात आला.
विरांगनांच्या पतीच्या सर्वोच्च बलीदानाला मानवंदना म्हणून प्रत्येक वीरांगनेला ५० सहस्र रुपये आर्थिक साहाय्य करण्यात आले. ‘हा सन्मान म्हणजे संपूर्ण राष्ट्राच्या कृतज्ञतेचे आणि त्यांच्या त्यागाविषयीच्या सर्वोच्च आदराचे प्रतीक आहे’, असे सुरेश काकडे म्हणाले. या वेळी पद्मश्री शंकर महादेवन यांनी राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, स्वयंसेवक, एन्.सी.सी. कॅडेट्स, प्रायोजक, सामाजिक संस्था आणि उपस्थित सर्व देशप्रेमी नागरिकांचे शेवटी सुरेश काकडे यांनी आभार मानले.
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !