
पुणे – शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या प्रकल्पाला पुन्हा चालना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढील वर्षभरात ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ महत्त्वाचे रस्ते पूर्ण करण्याचा दावा महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे. हे रस्ते झाल्यावर उपनगरांमधील वाहतूककोंडी सुटण्यास साहाय्य होईल. भूसंपादन, तांत्रिक अडचणी आणि अन्य कारणांमुळे अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण राहिली होती. रस्त्यांची कामे झाल्यास नव्या रस्त्याची आवश्यकता अल्प होईल, असा निष्कर्ष पथ विभागाने काढल्याने प्रस्तावित रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ७०० ‘मिसिंग लिंक’ (दोन मोठ्या रस्त्यांना किंवा महामार्गांना जोडणारा जो भाग अपूर्ण असतो तो जोडणे) असून त्यांची लांबी ५२० किलोमीटर आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी या रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन काम चालू करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येईल. वर्षभरात हे रस्ते पूर्ण झाले, तर नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा दिलासा मिळेल.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना २ ऑगस्टला ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार !