मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !

अमरावती – मेळघाटातील आदिवासी बालकांपैकी २१ जणांना जन्मजात हृदयरोग असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या अंतर्गत राबवलेल्या ‘प्रोजेक्ट देवा’ या विशेष उपक्रमात पहाणी केल्यावर वरील धक्कादायक वास्तव उघड झाले. या बालकांवर तातडीने हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

१. मेळघाटातील अनेक गावे दुर्गम डोंगररांगांत वसली आहेत. वाहतुकीच्या मर्यादित सुविधा, तज्ञ आधुनिक वैद्यांचा अभाव आणि परिस्थिती यांमुळे अनेक बालकांना वेळेत निदान अन् उपचार मिळत नाहीत. जन्मजात हृदयविकाराचे निदान विलंबाने झाल्यास त्याचा परिणाम बालकांची वाढ, पोषण आणि आयुर्मान यांवर होतो.

२. मोहिमेत १७ सहस्र बालकांची पडताळणी करण्यात आली आहे. यातील प्राथमिक पडताळणीत १२३ बालकांना हृदयरोग असण्याची शक्यता असल्याचे लक्षात आले. चाचणीनंतर यातील २१ बालकांना हृदयरोग असल्याचे दिसून आले.

संपादकीय भूमिका

आरोग्य विभाग याकडे लक्ष देईल का ?