
नवी मुंबई – कारगिल युद्ध हे भारतीय सैनिकांचा अजोड पराक्रम आणि अजिंक्य मनोबल यांची अमरगाथा आहे, असे वक्तव्य कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त) यांनी वाशी येथे केले. जम्मू-कश्मीर डोगरा समाज, सावरकर विचार मंच आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘कारगिल विजयदिन’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी ‘अमर ज्योती’च्या प्रतिकृतीला आदरांजली वाहिली. कर्नल गोयल यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांच्या स्मृतीला श्रद्धांजली देण्यात आली.
कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त) म्हणाले, ‘‘कारगिल युद्ध हे जगातील सर्वांत उंच युद्धभूमीवर लढलेले युद्ध आहे. १४ ते १८ सहस्र फूट उंचीवरील डोंगरमाथ्यावरील ठाणी शत्रूने धोक्याने काबीज केली होती. नियंत्रण रेषेचे उल्लंघन न करता कडाक्याच्या थंडीत अनेक सहस्र फुटांची पर्वतरांग चढून जाऊन ही शिखरे भारतीय सैनिकांनी जिंकून घेतली.’’ या वेळी त्यांनी कारगिल युद्धातील अनुभव कथन केले.
व्यासपिठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभदा नायक, चित्रपट अभिनेते मुकेश ऋषी, विहिंपचे राष्ट्र्रीय प्रवक्ते शंकर गायकर, प्रा. राजश्री घोरपडे, प्रा. सारंग भागवत, जम्मू-कश्मीर डोगरा समाजाचे अध्यक्ष कृष्णा पंडित आणि सावरकर विचार मंचचे अध्यक्ष संतोष कानडे उपस्थित होते.
कृष्णा पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर मुकेश ऋषी आणि संतोष कानडे यांनी कारगिल युद्धाबद्धल आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. प्रो. सारंग भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सुप्रिया देशपांडे यांच्या वन्दे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
वाशी येथे कारगिल विजय दिवसाचा सोहळा उत्साहात पार पडला !