बांका (बिहार) येथून पी.एफ्.आय.च्या आणखी ४ आतंकवाद्यांना अटक !

भारताला वर्ष २०४७ पर्यंत ‘इस्लामी राष्ट्र’ करण्याच्या षड्यंत्र रचल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

पाटलीपुत्र (बिहार) – येथे ११ जुलै या दिवशी जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे संघटनेचे भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र उघड झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण करणारी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि बिहार पोलीस यांनी राज्यातील बांका येथून संघटनेच्या आणखी ४ आतंकवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांना त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे.

१. याआधी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील दरभंगा येथे पी.एफ्.आय.च्या नूरुद्दीन, सनाउल्लाह आणि मुस्तकीम या विघातक कारवाया करणार्‍या सदस्यांच्या निवासस्थानांवर छापा टाकला होता.

२. नूरुद्दीनचा आधीपासून शोध घेण्यात येत होता. त्याला उत्तरप्रदेश पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लक्ष्मणपुरी येथून अटक केली होती, तर सनाउल्लाह आणि मुस्तकीम फरार आहेत.

३. आतापर्यंत या प्रकरणात २६ संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ते सर्व पी.एफ्.आय.चे कार्यकर्ते सदस्य आहेत. ११ जुलै या दिवशी पोलिसांनी अतहर परवेज आणि झारखंडमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी महंमद जलालुद्दीन यांना अटक केली होती. त्या वेळी अनेक राज्यांतील धर्मांध मुसलमानांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती.

संपादकीय भूमिका

सरकारने ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे खणून काढून त्यावर बंदी लादणे अत्यावश्यक !