
पनवेल – अतीवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींमध्ये रहाणार्या नागरिकांनी कोणताही धोका न पत्करता तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, तसेच सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या इमारतींचे संरचनात्मक (स्ट्रक्चरल) ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. धोकादायक इमारत कोसळून कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्यास त्याचे दायित्व संबंधित इमारतीतील रहिवासी, मालक आणि भाडेकरू यांचे राहील, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
धोकादायक इमारत रिकामी करून पाडण्याची कार्यवाही न केल्यास अशा इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करून आवश्यकतेनुसार पोलिसांच्या साहाय्याने इमारत रिकामी करून पाडण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल, असेही महापालिकेने सांगितले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संपक क्रमांक : ०२२-७४५८०४०/ ४१ / ४२
टोल फ्री क्रमांक : १८००-२२७-७०१
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !