दोघांविरुद्ध गुन्हा नोंद; आरोपींचा शोध चालू !

मुंबई – सामाजिक माध्यमावरील ओळखीतून २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ‘हनीट्रॅप’च्या (महिलेच्या माध्यमातून व्यक्तीला जाळ्यात अडकवण्याच्या) जाळ्यात अडकवण्यात आले. त्याचा अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत त्याच्याकडून ९ लाख ३० सहस्र रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह २ जणांविरुद्ध खंडणी, धमकी, तसेच माहिती तंत्रज्ञान या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध चालू आहे.
तरुणाची ‘आहाना’ नावाच्या तरुणीशी सामाजिक माध्यमावर ओळख झाली. मैत्री वाढत गेल्यावर तिने त्याला व्हिडिओ कॉल करून कपडे काढण्यास प्रवृत्त केले. तिच्यावर विश्वास ठेवून त्याने स्वतःचे अश्लील व्हिडिओ तिला पाठवले. तरुणीने तिच्या साथीदाराच्या साहाय्याने हे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. भीतीपोटी विद्यार्थ्याने ५५ वेळा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ९ लाख ३० सहस्र रुपये तिला पाठवले; पण ती खंडणीची मागणी करतच होती. या प्रकरणी विद्यार्थ्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)