आकाशात उडून शत्रूवर लक्ष ठेवू शकणार्‍या सैनिकांच्या ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ची चाचणी

सध्या भारतीय सैन्य पूर्व लडाख सीमेच्या वादानंतर चीनच्या ३५०० कि.मी. नियंत्रण रेषेवर (एल्.ए.सी.) संपूर्ण पाळत ठेवत आहे. दुर्गम सीमाभागात शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सैन्याने ब्रिटीश आस्थापनाकडून ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ मागवले आहेत.

देहली उच्च न्यायालयाने ‘अग्नीपथ’ योजनेच्या संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्या !

देहली उच्च न्यायालयाने केंद्रशासनाच्या ‘अग्नीपथ’ या सैन्यातील भरती संदर्भातील योजनेला आव्हान देणार्‍या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. ‘ही योजना आणण्याचा उद्देश देशाच्या सैन्याला अधिकाधिक सक्षम करणे हा आहे आणि ते देशाच्या हिताचे आहे’, असे मत न्यायालायने याचिका फेटाळतांना म्हटले आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात एका सैनिकाचा मृत्यू !

काँग्रेस सरकारची सत्ता असलेल्या छत्तीसगड येथे कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीनतेरा ! जिथे सैनिक आणि पोलीस यांच्या सुरक्षिततेची ही स्थिती आहे, तिथे सर्वसाधारण जनतेची काय कथा !

इस्रायलच्या आक्रमणात पॅलेस्टाईनचे ११ आतंकवादी ठार !

पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांचे प्रवक्ते नबील अबू रुदिनेह यांनी एकीकडे इस्रायली आक्रमणाचा निषेध केला; परंतु दुसरीकडे इस्रायलला आक्रमण थांबवण्याची विनवणीही केली.

इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर केलेल्या आक्रमणात ५ जण ठार

दीड मासापूर्वी इस्रायलने दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले होते. त्यात २ सैनिकांसह ४ नागरिक ठार झाले होते.

अफगाणिस्तानवर आक्रमण करणार नाही ! – पाकिस्तान

अफगाणिस्तानवर पाकिस्तान कधीही आक्रमण करू इच्छित नाही. मागील घोडचुका आम्ही पुन्हा करू इच्छित नाही. त्यामुळे हेच योग्य होईल की, अफगाणिस्तानमध्ये कायदे लागू करणार्‍या संस्थांनी योग्य काम करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी येथे व्यक्त केली.

पंजाबमध्ये पाकिस्तानी तस्करांशी भारतीय सैनिकांची चकमक

गुरदासपूर येथील भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी तस्कर यांच्यात चकमक उडाली. हे तस्कर अमली पदार्थ आणि शस्त्रे यांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. ते पाईपद्वारे भारताच्या सीमेमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रे पोचवत होते.

संरक्षण क्षेत्रात स्‍वयंपूर्णतेचे पाऊल !

केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी प्रत्‍येक वेळी आर्थिक तरतूद वाढवत असून वर्ष २०१९-२० मध्‍ये ५८ टक्‍के, वर्ष २०२१-२२ मध्‍ये ६४ टक्‍के, तर २०२२-२३ मध्‍ये ६८ टक्‍के इतक्‍या मोठ्या प्रमाणात रक्‍कम स्‍वदेशी गुंतवणुकीसाठी राखीव ठेवली.

(म्हणे) ‘सैन्यात मुसलमानांना ३० टक्के आरक्षण दिल्यास ते पाकला धडा शिकवतील !’ – गुलाम रसूल बलियावी,  संयुक्त जनता दलाचे नेते

जम्मू-काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांच्या सैन्यात मुसलमान सर्वाधिक होते. जेव्हा पाकने काश्मीरवर आक्रमण केले, तेव्हा हे मुसलमान सैनिक पाकला जाऊन मिळाले होते. हा इतिहास आहे.

भारतीय सैन्यात अग्नीविरांच्या भरतीसाठी ‘ऑनलाईन सीईई’सह नवीन भरती प्रणाली

‘ऑनलाईन सीईई’ १२ एप्रिलपासून चालू होईल. सीईईमध्ये निवडले गेलेले उमेदवार हे ‘फिजिकल फिटनेस टेस्ट’, ‘फिजिकल मेजरमेंट टेस्ट’ आणि वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असतील.