(म्हणे) ‘सैन्यात मुसलमानांना ३० टक्के आरक्षण दिल्यास ते पाकला धडा शिकवतील !’ – गुलाम रसूल बलियावी,  संयुक्त जनता दलाचे नेते

संयुक्त जनता दलाचे नेते गुलाम रसूल बलियावी यांचा फुकाचा दावा !

पाटलीपुत्र (बिहार) – भारतीय सैन्‍यामध्‍ये मुसलमानांना ३० टक्‍के आरक्षण दिल्‍यास ते पाकिस्‍तानला ‘थंड’ करून टाकतील (धडा शिकवतील), असे विधान संयुक्‍त जनता दलाचे नेते गुलाम रसूल बलियावी यांनी केले आहे. ‘मुसलमानांना ठाऊक आहे की, पाकिस्‍तानला कसा धडा शिकवायचा ? वर्ष १९६५च्‍या युद्धात अब्‍दुल हमीद याने पाकचे टँक उद़्‍ध्‍वस्‍त केले होते. पाकच्‍या क्षेपणास्‍त्राचा विरोध करण्‍यासाठी अब्‍दुल कलाम आझाद या मुसलमानानेच भारतासाठी क्षेपणास्‍त्रे बनवली’, असे विधानही बलियावी यांनी या वेळी केले. ‘भारतीय सैन्‍यात राजपूत रेजिमेंट, शीख रेजिमेंट, जाट रेजिमेंट आहे; मात्र मुसलमान रेजिमेंट नाही, ती बनवली पाहिजे’, अशी मागणीही बलियावी यांनी या वेळी केली.

गुलाम रसूल बलियावी

बलियावी यांच्‍या विधानाविषयी पक्षाचे प्रमुख आणि राज्‍याचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार म्‍हणाले की, कोण काय बोलत आहे, याकडे मी लक्ष देत नाही. माझे लक्ष केवळ कामाकडे आहे. नंतर मी बलियावी यांना भेटून ते काय बोलत आहेत, हे विचारून घेईन.

संपादकीय भूमिका 

जम्‍मू-काश्‍मीरचे महाराजा हरिसिंह यांच्‍या सैन्‍यात मुसलमान सर्वाधिक होते. जेव्‍हा पाकने काश्‍मीरवर आक्रमण केले, तेव्‍हा हे मुसलमान सैनिक पाकला जाऊन मिळाले होते. हा इतिहास आहे. इंग्रजांनी कधीही सैन्‍यात मुसलमानांसाठी तुकडी बनवली नाही आणि स्‍वातंत्र्यानंतरही बनवण्‍यात आली नाही, हेच यामागील कारण असावेे, हे लक्षात येते !