इस्रायलच्या आक्रमणात पॅलेस्टाईनचे ११ आतंकवादी ठार !

१०० हून अधिक घायाळ

जेरूसेलेम (इस्रायल) – इस्रायली सैनिकांनी २२ फेबु्रवारीला केलेल्या आक्रमणात पॅलेस्टाईनचे ११ आतंकवादी ठार झाले. यात ४ बंदूकधार्‍यांचा समावेश आहे. पॅलेस्टाईनचे काही आतंकवादी इस्रायलवर आक्रमण करण्याचे षड्यंत्र रचत असल्याची माहिती इस्रायलला मिळाली. त्यानंतर इस्रायलने या आतंकवाद्यांना कह्यात घेण्यासाठी नब्लस येथे राबवलेल्या शोधमोहीमेच्या वेळी या आतंकवाद्यांनी इस्रायली सैनिकांवर आक्रमण केले. त्यास प्रत्युत्तर देत इस्रायली सैनिकांनी प्रतिआक्रमण केले.

चालू वर्षी पॅलेस्टाईनचे ६२ जण मारले गेले

पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, वर्ष २०२३ मध्ये पॅलेस्टाईनचे ६२ जण मारले गेले. यासह इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पॅलेस्टाईनच्या आक्रमणात इस्रायलचे १० सैनिक मारले गेले, तर १ युक्रेनी पर्यटक ठार झाला.

आक्रमण थांबवा ! – पॅलेस्टाईनची विनवणी

पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांचे प्रवक्ते नबील अबू रुदिनेह यांनी एकीकडे इस्रायली आक्रमणाचा निषेध केला; परंतु दुसरीकडे इस्रायलला आक्रमण थांबवण्याची विनवणीही केली.