पंजाबमध्ये पाकिस्तानी तस्करांशी भारतीय सैनिकांची चकमक

हेरॉइन आणि शस्त्रसाठा जप्त

गुरदासपूर (पंजाब) – येथील भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी तस्कर यांच्यात चकमक उडाली. हे तस्कर अमली पदार्थ आणि शस्त्रे यांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. ते पाईपद्वारे भारताच्या सीमेमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रे पोचवत होते. त्या वेळी भारतीय सैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर तस्करांनी गोळीबार केला. त्यानंतर दोघांत चकमक उडाली. यानंतर तस्कर पळून गेले. सैनिकांनी येथून हेरॉइनची २० पाकिटे, २४२ जिवंत काडतुसे आणि २ पिस्तुले जप्त केली.