हिंदु जनजागृती समितीकडून पत्र पाठवून विरोध
आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारने म.फि. हुसेन यांच्या हिंदु देवतांचा आणि भारतमातेचा अवमान करणार्या चित्रांवर बंदी न घातल्यामुळे सातत्याने अशा प्रकारची चित्रांची विक्री केली जात आहे, हे राजकीय पक्षांना अन् त्यांना जाब न विचारणार्या हिंदूंना लज्जास्पद !
मुंबई – येथील ‘कल्पवृक्ष’ या आस्थापनाच्या संकेतस्थळावरून चित्रांची विक्री करण्यात येते. यात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचाही समावेश आहे. यामुळे हिंदु धर्माभिमानी या आस्थापनाचा विरोध करत हुसेन यांच्या चित्रांची विक्री रोखण्याची मागणी करत आहेत. धर्मप्रेमींनी याविषयीची माहिती लक्षात आणून दिल्यावर हिंदु जनजागृती समितीकडून कल्पवृक्ष आस्थापनाला पत्र पाठवून हुसेन यांची चित्रे विक्रीतून हटवून त्यांचे उदात्तीकरण थांबवण्याची मागणी केली आहे.
मुंबई स्थित https://t.co/bmELkeMTlS से हो रही है भारतमाता एवं हिन्दू देवी-देवताओं के नग्न चित्र निकालनेवाले हिन्दुद्रोही चित्रकार MF Husain के चित्रों की ऑनलाइन बिक्री
वैध मार्ग से विरोध कर इसे हटाने की मांग करें
Email : [email protected]
Whats App : 9820054626 pic.twitter.com/vCx52w0eSm
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) December 5, 2020
१. या पत्रात म्हटले आहे की, हुसेन यांनी हिंदु देवतांची, तसेच भारतमातेची नग्न चित्रे काढून त्यांचा अवमान केला. तसेच ही चित्रे लिलावासाठी ठेवली होती. यामुळे कोट्यवधी हिंदू आणि राष्ट्रभक्त यांच्या भावना दुखावल्या होत्या. याविरोधात पोलिसांकडे १ सहस्र २५० तक्रारी करण्यात आल्या होत्या.
२. या पत्रावर आस्थापनाकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. दुसरीकडे धर्मप्रेमी पुढील संपर्कावर वैध मार्गाने विरोध करून आस्थापनाला चित्र काढण्याची मागणी करत आहेत.
इमेल : [email protected], [email protected]
व्हॉट्सअॅप क्रमांक : ९८२००५४६२६
संयत मार्गाने निषेध करा !निषेधामागचा मुख्य उद्देश वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कुणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्याला चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा दृष्टीकोन निषेधामागे हवा ! |