मुंबई – सामाजिक माध्यमातून द्वेषमूलक ‘पोस्ट’ केल्याप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकार्यांनी मुंबई पोलिसांना कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला कंगना आणि रंगोली यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा रहित करण्याची मागणी केली आहे. तक्रारदार मुनव्वर अली सय्यद यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला. कंगना सातत्याने ट्विटर आणि मुलाखती या माध्यमांतून हिंदु आणि मुसलमान या कलाकारांमध्ये जातीय तणाव निर्माण करते आणि फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे तक्रारदाराने म्हटले आहे.