‘इंस्टाग्राम’वर हिंदुद्वेष्टे अ‍ॅन्जियो फर्नांडिस याच्याकडून श्री गणेश आणि हिंदु देवता यांच्याविषयी अश्‍लील ‘पोस्ट’ प्रसारित

‘भारत माता की जय’, ‘गोमंतक हिंदु प्रतिष्ठान’ आणि ‘परशुराम सेना’ यांच्या वतीने वास्को पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

  • अशा गोष्टींविषयी तथाकथित धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, चर्च किंवा तिच्याशी निगडित संस्था किंवा संघटना यांपैकी कुणीही तोंड उघडत नाही ! यावरून त्यांचा सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता, ही बेगडी असते हे सिद्ध होते !
  • असे धर्मांधांच्या श्रद्धास्थानांविषयी झाले असते, तर बेंगळुरूमध्ये झाली तशी दंगल झाली असती.

वास्को, २१ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदुद्वेष्टे अ‍ॅन्जियो फर्नांडिस याने ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमांत श्री गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला श्री गणेश आणि हिंदु देवता यांच्याविषयी अश्‍लील ‘पोस्ट’ प्रसारित केले आहेत. याविषयी ‘भारत माता की जय’, ‘गोमंतक हिंदु प्रतिष्ठान’ आणि ‘परशुराम सेना’ यांनी हिंदुद्वेष्टे अ‍ॅन्जियोे फर्नांडिस याच्या विरोधात वास्को पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

तक्रार करणार्‍या संबंधित संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले, ‘‘हिंदुद्वेष्टे अ‍ॅन्जियो फर्नांडिस हा ‘इंस्टाग्राम हँडलर’ आहे आणि तो गोमंतकीय आहे. त्याने ‘इंस्टाग्राम’वर केलेल्या ‘पोस्ट एवढ्या अश्‍लील आहेत की, त्याविषयी बोलायलासुद्धा लाज वाटते. यानंतर हिंदुद्वेष्टे अ‍ॅन्जियो फर्नांडिस याने त्याचा अकाऊंट ‘डिअ‍ॅक्टीवेट’ केला आहे.’’ तक्रारीत म्हटले आहे की, ‘हिंदुद्वेष्टा अ‍ॅन्जियो फर्नांडिस याच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद करावा’, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘इंस्टाग्राम’वर ‘पोस्ट’ केलेल्या अश्‍लील ‘पोस्ट’विषयी संक्षिप्त माहिती

१. ‘इसिस’च्या आतंकवाद्यांनी एका व्यक्तीचे डोके उडवल्याचे आणि त्या ठिकाणी श्री गणेशाचे मुख लावलेली एक ‘पोस्ट’ आहे. या ‘पोस्ट’वर ‘निष्पाप लोकांचे ‘इसिस’ डोके उडवते’, असे लिहिले आहे.

२. श्री गणेशाच्या एका चित्रावर ‘श्री गणेश ‘डायट’ पाळत नाही’, असे लिहिले आहे. श्री शंकराच्या एका चित्रावर ‘श्री शंकर हा एक ‘डान्सर’ आहे’, असे म्हटले आहे. गोपिकांसमवेत असलेल्या श्रीकृष्णाच्या छायाचित्राला अश्‍लील शीर्षक देण्यात आले आहे.

३. एका ‘पोस्ट’मध्ये शिर्डीचे श्री साईबाबा यांच्या छायाचित्राच्या खाली अश्‍लील लिखाण करण्यात आले आहे. या ‘पोस्ट’मध्ये एका बाजूला श्री शंकर आणि पार्वती यांच्या हातात बाल श्री गणेश असल्याचे एक चित्र आहे. या चित्राखाली ‘फेव्हिक्विक’चे छायाचित्र ‘पोस्ट’ केले आहे.

‘गोमंतक परशुराम सेना’ यांच्या वतीने मडगाव शहर पोलीस ठाण्यातही तक्रार प्रविष्ट

मडगाव – हिंदुद्वेष्टे अ‍ॅन्जियो फर्नांडिस याच्या विरोधात ‘गोमंतक परशुराम सेना’ यांच्या वतीने मडगाव शहर पोलीस ठाण्यातही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. तक्रार प्रविष्ट केल्यानंतर ‘गोमंतक परशुराम सेने’चे सचिव श्री. आदिश उसगावकर पत्रकारांना म्हणाले, ‘‘हिंदुद्वेष्टा अ‍ॅन्जियो फर्नांडिस याला पोलिसानी त्वरित कह्यात घ्यावे आणि देवतांचे विडंबन करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. हिंदु धर्माला कुणीही गृहित धरू शकत नाही.’’