सातारा येथे घरगुती श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संगम माहुली येथील नदीकाठी भाविकांचे प्रबोधन करण्यात येत होते. या प्रबोधनामुळे अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले.