
पिंपरी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म अन् निर्वाण भूमी असणार्या आळंदी, देहू, टाळगाव चिखली, तळवडे या पंचक्रोशीतील देहू ते आळंदी हा १६ किलोमीटरचा पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी आळंदी देवस्थानाचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी ह.भ.प. राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
‘ज्याप्रमाणे उत्तरांचल सरकारने ‘देवभूमी’ नावाने काही परिसर जाहीर करून तेथे संरक्षण दिले, त्याच धर्तीवर देहू ते आळंदी या पंचक्रोशीतील परिसर ‘संतभूमी’ म्हणून जाहीर करावा, तसेच शासनाने विशेष निधी देऊन या परिसराचा विकास करावा’, असेही टिळक यांनी सांगितले. ‘महाराष्ट्र सरकारने अधिवेशनात संतभूमीचा विषय मांडून तो राज्य सरकारकडून संमत करून घ्यावा. वारकरी आणि नागरिक यांमध्ये आम्ही जनजागृती करू’, असे ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांनी सांगितले.
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !
मुणगे येथे अणूऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध