
पुणे – नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा तिसरा मुक्काम असतो. वारकर्यांच्या स्वागतासाठी मंदिरात आणि परिसरात विशेष सिद्धता केली जाते. हे ऐतिहासिक पालखी मुक्कामाचे केंद्र आहे. पालखी सोहळा अगदी काही दिवसांवर आला असून पुणे महापालिकेच्या वतीने मंदिराच्या आजूबाजूच्या मार्गावर भव्य पत्र्याचा मंडप उभारण्यात आला आहे. लवकरच मंदिराची विद्युत्रोषणाई, गाभारा सजावट, मंदिर परिसराची रंगरंगोटी केली जाणार आहे. जेव्हा पालखी येते, तेव्हा पालिकेच्या वतीने वारकर्यांसाठी झोपण्याची व्यवस्था, पाणी, स्वच्छतागृहे, औषधे, पाणी, तसेच अन्य सुविधा पुरवण्यात येतात.

या संदर्भात मंदिराचे व्यवस्थापक श्री. आनंद पाध्ये म्हणाले, ‘‘मंदिराच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर चालू आहे. काम पूर्ण झाल्यावर लवकरच मंदिराच्या चांदीच्या कमानीला ‘पॉलीश’ करण्यात येईल. पालखी सोहळ्यातील दिंडीतील वारकर्यांचा विसावा याच मंदिरातील सभागृहात असतो. जवळपास ३ सहस्र वारकरी मुक्कमाला असतात. त्यांच्या दुपारच्या आणि रात्रीच्या प्रसादाची व्यवस्था मंदिराच्या वतीने करण्यात येते. त्यासाठी आचारी बोलावून स्वयंपाक केला जातो.’’
तिसरा मुक्काम इथेच का ?पालखी परंपरा चालू झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ भाविकांना पंढरपूरच्या वारीला जाणे शक्य होत नव्हते. त्या वेळी नाना पेठेत रहाणार्या गोसावी नावाच्या विठ्ठलभक्ताला पांडुरंगाने स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला आणि निवडुंगाच्या झाडाखाली विठ्ठलाची मूर्ती असल्याचे सांगितले. त्याकाळी या परिसरात निवडुंगाची भरपूर झाडे होती. गोसावी यांनी ती झाडे तोडली आणि एका झाडाखालून स्वयंभू श्री विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली अन् पुढे मंदिर बांधले; म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा तिसरा मुक्काम याच मंदिरात केला जातो. |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !