मुख्यमंत्र्यांशी बोलून वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावतो !

भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आश्वासन

सातारा, २५ जून (वार्ता.) – प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी नाभिक संघटनांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी ‘मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून स्मारकाचा प्रश्न मार्गी लावतो’, असे आश्वासन खासदारांनी दिले. ‘वीर जिवाजी महाले उत्सव समिती’ आणि ‘स्वाभिमानी नाभिक समाज संघटना’ यांनी निवेदनात ‘प्रतापगडाच्या लढाईमध्ये छत्रपती शिवरायांचे प्राण वाचवणारे वीर जिवा महाले यांचे स्मारक उभारणे आवश्यक आहे’, असे म्हटले.