एन्.सी.ई.आर्.टी.च्या नववीच्या अभ्यासक्रमात आणीबाणीचा समावेश करण्याचे डॉ. नीलम गोर्हे यांच्याकडून स्वागत !

मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एन्.सी.ई.आर्.टी.ने) इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात वर्ष १९७५ च्या आणीबाणीचा विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांना देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची जाणीव होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या, ‘‘काँग्रेसने आणीबाणी लागू करून देशात हुकूमशाही व्यवस्था निर्माण केली होती. त्या काळातील परिस्थिती, लोकशाही संस्थांवरील परिणाम आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आलेली बंधने यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. आणीबाणीचा काळ मी विद्यार्थीदशेत अनुभवला. तेव्हा प्रसारमाध्यमांवर निर्बंध होते आणि वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित होत नव्हत्या.’’
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !