मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत माहिती

मुंबई – कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांची यावर्षी पुष्कळ मोठी हानी झाली आहे. हानीग्रस्त बागायतदार शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या (NDRF – National Disaster Response Fund) निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक साहाय्य देण्याची राज्य सरकारची सिद्धता असल्याची ग्वाही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी २५ जून या दिवशी विधानसभेत दिली.
कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या हानीविषयीचे सूत्र आमदार नीलेश राणे, आमदार निकम आणि अन्य काही आमदारांनी विधानसभेत उपस्थित केले होते. त्यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले; मात्र आमदारांचे समाधान न झाल्याने आमदार नीलेश राणे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
कोकणातील हानीग्रस्त आबां आणि काजू बायतदारांना हानीभरपाई देण्याच्या प्रक्रियेत मंत्री राणे सहभागी असल्याने याविषयावर माहिती देतांना त्यांनी सांगितले की, ‘या वर्षी आंबा आणि काजू पिकांची अनुमाने ९० टक्क्यांपर्यंत हानी झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी विशेष बैठकही घेतली आहे. विशेष गोष्ट (स्पेशल केस) म्हणून कोकणातील बागायतदारांना कसे साहाय्य करता येईल’, यासाठी राज्यसरकार प्रयत्नरत आहेत.’
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !