प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

मुंबई – राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतीमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित ८८ नवीन महसूल कार्यालयांच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे. यामध्ये १० अपर जिल्हाधिकारी कार्यालये, ७ उपविभागीय कार्यालये, २ तहसीलदार कार्यालये आणि ६९ अपर तहसीलदार कार्यालये यांचा समावेश आहे. नागरिकांना विविध दाखल्यांसाठी किंवा सरकारी कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये  

कल्याण (ठाणे), दापोली (रत्नागिरी), बारामती (पुणे), फलटण (सातारा), पंढरपूर (सोलापूर), किनवट (नांदेड), अचलपूर (अमरावती), पुसद (यवतमाळ), खामगाव (बुलढाणा) आणि नागपूर (ग्रामीण).

नवीन उपविभागीय कार्यालये

मुंबई शहरातील फोर्ट, मुंबई उपनगरातील बोरीवली, तसेच शहापूर (ठाणे), देवगड (सिंधुदुर्ग), साक्री (धुळे), जामनेर (जळगाव) आणि सिन्नर (नाशिक).

नवीन अपर तहसीलदार कार्यालये

मुंबई उपनगरातील चेंबूर, मालाड, वांद्रे; ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, बेलापूर; पुणे जिल्ह्यातील चाकण आणि नाशिकमधील लासलगाव आणि सिन्नर.