नवरात्रीत झालेल्या देवी होमाच्या वेळी फोंडा, गोवा येथील सौ. गौरी प्रभास नायक यांना आलेल्या अनुभूती
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला प्रेमाने जवळ घेतले. तो क्षण अजूनही आठवला की, मला अत्यंत उत्साह वाटतो आणि माझे मन आनंदाने भरून येते. मला इतके प्रेम कधीच अनुभवायला मिळाले नव्हते. अनेक साधक आपले अनुभव सांगत होते. मी केवळ ‘गुरुचरणी कृतज्ञता !’ हाच ‘जप’ करत होते.