
१. मनातील प्रसुतीबद्दलची भीती घालवण्यासाठी सत्संग घेणार्या साधिकेने स्वयंसूचना देण्यास सांगणे
‘वर्ष २०२१ मध्ये मी गरोदर राहिले. आधुनिक वैद्यांनी मला डिसेंबरच्या शेवटी प्रसुतीचा दिनांक दिला होता. जसजसे दिवस भरत गेले, तसतशी मला ‘मी प्रसुतीला कशी सामोरी जाऊ ?’, अशी भीती वाटू लागली. माझ्या मनातील भीतीबद्दल मी सत्संगात सांगितले. तेव्हा सत्संग घेणार्या सौ. सुगंधी जयकुमार (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४६ वर्षे) यांनी मला पुढील स्वयंसूचना देण्यास सांगितली, ‘जेव्हा मला प्रसुतीबद्दल भीती वाटत असेल, तेव्हा ‘मी श्रीरामाच्या चरणांजवळ झोपले आहे’, असा भाव ठेवीन आणि नामजप करायला आरंभ करीन.’

२. प्रसुतीच्या वेळी भीती वाटल्यावर स्वतःजवळ परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अस्तित्व जाणवणे
मी ती स्वयंसूचना एक मास घेत होते. १७.१२.२०२१ या दिवशी मला प्रसुतीसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. भरतीसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत माझा नामजप चालू होता. त्यामुळे मला शांत वाटत होते. माझी देवावर श्रद्धा होती. मला वेदनाशामक ‘इंजेक्शन’ दिल्यानंतर माझ्या जवळ कुणीही नव्हते. तेव्हा मला भीती वाटू लागली. त्या वेळी मला माझ्या जवळ परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अस्तित्व जाणवू लागले.
३. मी स्वयंसूचना दिल्यामुळे मला वेदना होत असतांनाही मी नामजप करू शकत होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मी वेदना सहन करू शकत होते.
माझ्या प्रसुतीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला स्वयंसूचनांचा पुष्कळ लाभ झाला. त्याबद्दल मला देवाप्रती कृतज्ञता वाटली. श्री गुरूंच्या कृपेने दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी मला मुलगी झाली. आता जेव्हा मला प्रसुतीचा प्रसंग आठवतो, तेव्हा ‘ती एक दैवी अनुभूती होती’, असे मला वाटते.’
– सौ. कृतिका एस्., चेन्नई, तमिळनाडू. (९.१.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |