व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे समवेत आहेत’, असे जाणवणे

कु. माधुरी दुसे

‘एकदा मला गुरुदेवांचा सत्संग मिळाला. मी कोल्हापूर सेवाकेंद्रात व्यष्टी आणि समष्टी साधना करत असतांना मला काही मासांपासून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे ३ गुरु माझ्या समवेत असून ते मला साहाय्य करत आहेत’, असे जाणवते. त्या वेळी ‘तुम्हीच माझ्यात आणि समष्टीतही पालट घडवा’, अशी माझ्याकडून या ३ गुरूंना आपोआप प्रार्थना होते. प्रार्थना झाल्यावर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे ३ गुरु माझ्यात आणि समष्टीतही पालट घडवणार आहेत’, असे मला जाणवते आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

– कु. माधुरी दुसे, कोल्हापूर सेवाकेंद्र.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक