पर्यावरणप्रेमींचा कडाडून विरोध; प्रशासनाची सावध भूमिका
पुणे – कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी कृषी महाविद्यालयातील जुनी २२५ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाला दिला आहे. त्यावर पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर मात्र या वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये हरकती-सूचना मागवण्यात येतील. त्याचा अहवाल शासनाला सादर करू. त्यांचा निर्णय आल्यानंतर पुढील कार्यवाही चालू करू, असा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. या २२५ झाडांपैकी काही झाडे ७० वर्षांहून अधिक जुनी आहेत. वृक्षतोडीनंतर ९९ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. नवीन ४ सहस्र १५२ वृक्ष लावण्यात येतील, असे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :
|