९ राज्‍ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश येथे अल्‍प पाऊस पडणार !

महाराष्‍ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्‍यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये या वर्षी अल्‍प पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान तज्ञांनी वर्तवली

राज्यातील भात पिकाच्या उत्पादनात वाढ, तर उसाच्या उत्पादनात घट !

भाताची उत्पादकता मागील वर्षाच्या तुलनेत १८.४ टक्क्यांनी वाढली आहे. उसाचे उत्पादनक्षेत्र न्यून झाले, तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती ६.३ टक्क्यांनी वाढली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकोषांवर गुन्हा नोंदवा ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बोगस बियाण्यांचे वाटप केले जाते. खते आणि बियाणे देण्यासाठी आणि अन्य उत्पादने घेण्यासाठी शेतकर्‍यांवर दबाव आणला जातो. अशांवर कडक कारवाई करण्यात यावी.’’

देशात राबवले जाणार महाराष्ट्रातील सौर कृषी योजनेचे ‘मॉडेल’ !

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ऊर्जा विभागाने सौर ऊर्जेवरील वीज जोडण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. मार्च २०२२ पर्यंतच्या नोंदणीला जोडणी देण्यात आली आहे.”

शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे ! – मुख्यमंत्री

शेतकर्‍यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

शेतकर्‍यांना प्रलंबित थकबाकी आणि अनुदान लवकरच संमत करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

१९ ते २१ मे २०२३ या कालावधीत हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शासकीय कृषी योजना आणि नवीन अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान यांविषयी शेतकर्‍यांना माहिती देण्यात येत आहे.

नाशिक येथील जिल्हा उपनिबंधकांना ३० लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

सर्व शासकीय सुविधा आणि पुष्कळ वेतन असतांनाही जिल्हा उपनिबंधकासारख्या अधिकार्‍यांनी लाच घेणे लज्जास्पद !
प्रशासनाने अशा अधिकार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !

शेतकर्‍यांच्या पडक्या भूमीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून ७ सहस्र मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ! – विश्वास पाठक, महावितरणचे स्वतंत्र संचालक

शेतकर्‍यांच्या पडक्या भूमीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून वर्ष २०२५ पर्यंत ७ सहस्र मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यासाठी २८ सहस्र एकर भूमीवर हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

इयत्ता १ ली ते १० वीच्या अभ्यासक्रमात आता ‘कृषी’ विषयाचा समावेश !

इयत्ता १ ली ते १० वीच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

सडक्‍या सफरचंदांच्‍या वापरातून सिद्ध केलेल्‍या रसाची विक्री !

नवी मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये व्‍यापार्‍यांनी फेकून दिलेल्‍या सडक्‍या सफरचंदांचा रस करून तो विकण्‍यात येत आहे. हे एका व्‍हिडिओद्वारे उघड झाले.