नवी मुंबई, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – ए.पी.एम्.सी. (मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या) परिसरात सामासिक जागा (मार्जिनल स्पेस) बळकावणार्या ५० हून अधिक मोठ्या व्यावसायिकांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
काही व्यावसायिकांनी महापालिकेकडून पावसापासून संरक्षण होण्यासाठी ४ मासांची अनुमती घेऊन पावसाळी शेड उभारली होती; मात्र पावसाळा उलटून गेला, तरीही शेड काढण्यात आले नव्हते. हॉटेल व्यावसायिकांनी दुकानालगतच्या मोकळ्या जागाही हडपल्या होत्या. त्यामुळे अनेक लोकांनी याविषयी तक्रारी केल्या. या प्रकरणी कारवाई करून संबंधितांकडून ७३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.