काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलिसांना दिसली नाही का ? – रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना

पदवीधर निवडणुकीत झालेले मेळावे, तसेच रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर दिमाखात बसलेली नेतेमंडळी पोलीस प्रशासनाला दिसली नाही. शिवाजी पेठेत फिरंगाई प्रभागात झालेला मेळावा मात्र पोलिसांना दिसला आणि त्यांनी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला.

लातूर येथे बनला पहिला रेल्वे कोच

मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिला रेल्वे कोच शेल सिद्ध करण्यात आला आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा पहिला कोच शेल पूर्णत्वाने साकार करण्यात आला.

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाराचा राजकारणासाठी उपयोग महाराष्ट्रात पाहिलेला नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

भाजपच्या विरोधात बोलणार्‍यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाची चौकशी लावली जाते.=अनिल देशमुख

मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावला

सौ. वर्षा राऊत यांना समन्स आल्यावर शिवसैनिकांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावला.

 राज्य परिवहन मंडळाला मिळणार्‍या कर्जाचा प्रस्ताव स्थगित ?

बँकेकडून कर्जासाठी राज्य सरकारकडून हमी मिळत नसल्याने प्रस्ताव रखडला

माहूरगड येथील दत्त जयंती यात्रा रहित

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्तमंदिर परिसराचे प्रवेशद्वार २९ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

नेपाळमध्ये स्वतःची बाजू पुन्हा भक्कम करण्यासाठी चीनचे ४ नेते नेपाळमध्ये !

चीनची प्रत्येक चाल उधळून लावण्यासाठी भारताने प्रयत्न केला पाहिजे !

उत्तरप्रदेशात जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई

एकीकडे सर्व राजकीय पक्ष जातपात नष्ट करण्याची भाषा करतात; मात्र दुसरीकडे जातीचे राजकारण खेळत अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात !

उत्तरप्रदेशात एका मासात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या अंतर्गत ३५ जणांना अटक !

एका राज्यात केवळ एका मासात ३५ जणांना अटक होते, याचा अर्थ हे लोण किती मोठ्या प्रमाणात पसरले आहे, हे लक्षात येते. केंद्र सरकारने लवकरात लवकर देशस्तरावर असा कायदा करून हिंदु तरुणींना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा !