धनंजय मुंडेंच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन मुलांची माहिती लपवल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.

या याचिकेमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अपत्यांची खरी माहिती लपवली आहे. हा कायद्याच्या दृष्टीकोनातून गुन्हा आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात हस्तक्षेप करत धनंजय मुंडे यांना यासंदर्भात प्रतिवादी करावे.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.