तुझी सेवा करीन मी मनोभावें वो । माझें मन गोविंदीं रंगलें वो ॥

ब्रह्मोत्सवातील आर्त गायनसेवा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्याविषयी सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितलेली सूत्रे !

‘२३.२.२०२३ या दिवशी सप्तर्षी नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून झालेल्या नाडीवाचन क्रमांक २२२ मध्ये ‘वर्ष २०२३ मध्ये गुरुदेवांचा जन्मोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी सप्तर्षींनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पाहोनी ही गुरुमूर्ती मनोहर । दाटे कंठ लागे डोळियां पाझर ।

ब्रह्मोत्सवात गुरुदर्शनाने भावभक्तीचा जागर !

ती. डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांचीही वंदनीय उपस्थिती !

‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या अनुग्रहित आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या कृपांकित असणार्‍या डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराज यांची आणि त्यांच्या नंतर त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांचीही सुमारे एक तप सेवा केली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना उत्तराधिकार पत्र प्रदान !

सोहळ्यामध्ये ते धातूवर कोरलेले उत्तराधिकार पत्र सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रदान केले. सनातनच्या गुरुपरंपरेतील हे अनमोल क्षण साधकांनी भावपूर्णरित्या अनुभवले. श्री. विनायक शानभाग यांनी उत्तराधिकार पत्राचे वाचन केले.

नृत्याद्वारे आळवितो भगवंता । स्मरतो आम्हा तो आनंद कंददाता ॥

ब्रह्मोत्सवात गुरुचरणी नृत्यसेवा !

मनीची आर्तता श्रीचरणी अर्पू । श्रीमन्नारायणाचे संकीर्तन करू ॥

ब्रह्मोत्सवात गुरुचरणी गायनसेवा !

कन्हैय्याच्या खोड्या अवखळ । नृत्यसेवेतून होई दर्शन निखळ ॥

ब्रह्मोत्सवात गुरुचरणी नृत्यसेवा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या साधकांनी नृत्यादी सेवांद्वारे श्रीविष्णुची केली भावपूर्ण आराधना !

रथारूढ महाविष्णूची गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! श्रीविष्णुरूपात रथात विराजमान असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी कलेच्या माध्यमातून भाव अर्पण केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प.पू. (श्रीमती) सुशीला आपटे यांनी केले त्यांचे भावपूर्ण औक्षण !

‘देव भावाचा भुकेला असतो’, याची प्रचीती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि प.पू. आपटेआजी यांच्या भेटीच्या वेळी उपस्थित साधकांना आली.