देशविदेशातील भाविकांना अध्यात्माची अनुभूती देणारे माणगाव, कुडाळ येथील टेंब्येस्वामींचे जन्मस्थान !

‘श्रीक्षेत्र माणगाव’ हे क्षेत्र परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. टेंब्येस्वामी यांना दत्तप्रभु यांचा ४ था अवतार मानले जाते.

चर्चमध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या तीनही पाद्र्यांवर कडक कारवाई करण्यात यावी !

सोनई येथे ‘बिनीयार्ड ब्लेरुड चर्च’ येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तीनही पाद्र्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन २२ फेब्रुवारीला नगर येथील पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने देण्यात आले.

राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मेधा कुलकर्णी यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन !

प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याविषयी २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी म्हणजे कोथरूड येथील सात्यकी बंगल्यावर भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

टेंब्येस्वामींच्या अध्यात्मकार्याचा वसा समर्थपणे चालवणारी माणगाव येथील दत्त मंदिर न्यास संस्था !

एक छोटे देवस्थान असूनही माणगाव येथील श्री दत्त मंदिर न्यास संस्थेचा कारभार या दृष्टीने निश्चितच आदर्शवत् आहे. राज्यातील अन्य देवस्थानांनी याचा निश्चितच अभ्यास करावा. मंदिरांचे व्यवस्थापन सुधारल्यास मंदिरे खर्‍या अर्थाने भाविकांना उपासनेसाठी साहाय्यक ठरतील.

खर्ची (जिल्हा जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र’ फलकाचे अनावरण !

खर्ची गावात सर्व हिंदू रहातात. गावात हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्याला गती मिळावी म्हणून गावाच्या दर्शनी भागात ‘हिंदु राष्ट्र’ फलक लावण्यात आला. या वेळी ‘आदर्श हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा एकमुखाने निर्धार करण्यात आला.

छत्रपतींचे नाव घेतल्याने मुसलमानांची मते मिळणार नाहीत, असे पवारांना वाटायचे !

मी एका मुलाखतीत शरद पवार यांना ‘तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेता; पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही’ असे म्हटले होते. त्यावर त्यांनी मौन साधले होते.

पुणे येथे लाच स्वीकारतांना एकाला अटक !

एका ४२ वर्षीय व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी ‘सायबर विभागा’कडे ऑनलाईन तक्रार प्रविष्ट (दाखल) झाली होती. त्याचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्याकडे आहे. 

‘सीआयडी’ चौकशीसाठी २७ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

संत बाळूमामा मंदिराचे सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी बाळूमामांच्या भक्तांचा २७ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आंदोलनास संमिश्र प्रतिसाद !

मराठा समाजाला ‘ओबीसी’त आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात ‘रस्ता बंद’ आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या या आंदोलनाला राज्यातील बहुतांश शहरांत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. 

नाशिक येथे आर्थिक वादातून आधुनिक वैद्यांवर प्राणघातक आक्रमण !

कुठल्याही वादातून थेट समोरच्याची हत्या करण्याची बोकाळलेली विकृती समाजाच्या अधोगतीचे निर्देशक आहे. समाजातील ही असुरक्षितता संपवण्यासाठी कडक शासनासमवेत समाजाला धर्माचरणी करणे, हाच उपाय आहे !