
पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने त्या आता खासदार झाल्या आहेत. प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याविषयी २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी म्हणजे कोथरूड येथील सात्यकी बंगल्यावर भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर उपस्थित होत्या.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !