छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम !

जळगाव, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – खर्ची गावात सर्व हिंदू रहातात. गावात हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्याला गती मिळावी म्हणून गावाच्या दर्शनी भागात ‘हिंदु राष्ट्र’ फलक लावण्यात आला. या वेळी ‘आदर्श हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा एकमुखाने निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाला खर्ची येथील श्री श्री महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती महाराज, सरपंच विठ्ठल माळी, श्री. अशोक धर्मा मोपारी, ग्रामपंचायत सदस्य श्री. मधुकर भगत विश्व, सौ. अलकाबाई जीवन माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखिल कदम, श्री. विनोद शिंदे, तसेच गावातील सर्व हिंदुत्वनिष्ठ महिला आणि पुरुष उपस्थित होते.
या वेळी प्रमुख अतिथींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री. रामकृष्ण पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. प्रमोद महाजन यांनी केले.
‘‘स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगासमोर आदर्श ठेवला. छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध होऊया’’, असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्यातील खर्ची येथील श्री श्री महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती महाराज यांनी या वेळी केले.
संपादकीय भूमिकाफलक लावून हिंदु राष्ट्राचा जयघोष करणार्या खर्ची येथील धर्मप्रेमी नागरिकांचे हार्दिक अभिनंदन ! |
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या