अंतरवाली सराटी येथे साखळी उपोषण चालूच रहाणार !

आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे निघालेल्या मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईला प्रारंभ केला आहे. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकार्‍यांची धरपकड चालू झाली आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकार्‍यांसह एकूण ५ लोकांना कह्यात घेतले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ८ सहस्र ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर !

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून चालू झाले. पहिल्या दिवशी विधानसभेत ८ सहस्र ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. २७ फेब्रुवारी या दिवशी सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मान्य केल्या जातील. त्यानंतर दुपारी २ वाजता वर्ष २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल.

हडपसर (पुणे) येथे शाळकरी मुलींसमवेत अश्लील कृत्य करणार्‍या शिक्षकाला ३ वर्षांचा कारावास !

शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी न्यायालयाने कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या राठोड या शिक्षकाला ३ वर्षे साधा कारावास आणि २ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत.

जळगाव शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरावरील भगवे ध्वज काढू नयेत ! – हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथील महानगरपालिका आयुक्तांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीतील राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी यांचे झेंडे, फलक, बॅनर, होर्डिंग्ज आदी हटवण्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला होता.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने सनातन संस्थेचे कार्य अत्यंत प्रभावी ! – अखिल भारतीय धर्मसंघ पिठाधीश्वर श्री श्री १००८ श्री शंकर देव चैतन्य ब्रह्मचारी महाराज

सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पाहून त्यांनी सांगितले, ‘‘प्रदर्शनाला भेट देऊन आमचे माघमेळ्याला येण्याचे सार्थक झाले, असे आम्हाला वाटत आहे.’’

पाकिस्तानमध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांकडून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न !

पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका महिलेला जमावाने ठार  मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या कपड्यांवर काही अरबी शब्द लिहिलेले होते. इस्लामी कट्टरवाद्यांना हे शब्द कुराणातील आयते असल्याचे वाटले.

युक्रेनने ३१ सहस्र सैनिक गमावले ! – व्लोदिमिर झेलेंस्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन

रशिया-युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी या दिवशी २ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे युद्ध २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी चालू झाले होते. या २ वर्षांच्या युद्धात दोन्ही देशांची बरीच हानी झाली आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे कोठडीतून दोन कुख्यात गुंड पसार : ३ पोलीस निलंबित !

कोठडीमध्ये असलेल्या गुन्हेगारांना सांभाळू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना काय पकडणार ? अशा पोलिसांना केवळ निलंबित न करता बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी !

कर्करोगावरील उपचारांमध्ये भारतीय मसाले प्रभावी ! – ‘आयआयटी मद्रास’चे संशोधन

भोजन हा कोणत्याही संस्कृतीचा एक अविभाज्य घटक ! भारतीय अन्न पदार्थ पौष्टिक आणि सात्त्विक असल्याचे सर्वांना ठाऊक आहेच. त्याचे अनेक औषधी लाभही आहेत, जे काही वेळा आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारांपेक्षाही सरस आहेत.

‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये ८२ आतंकवादी झाले होते ठार ! – राजेंद्र रामराव निंभोरकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

काश्मीरच्या उरी येथील सैन्य तळावर वर्ष २०१६ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. यात काही सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. याचा सूड घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते.