हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि पालघरमध्ये २० ठिकाणी गदापूजन !

खारघर, सेक्टर ११ येथील हनुमान मंदिरात गदापूजनाच्या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक

मुंबई – हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने मुंबई आणि पालघर येथे २० ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.

भांडुप (प), एकता नगर येथील श्रीकृष्ण मंदिरात गदापूजनाच्या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक
भांडुप (पू), दातार कॉलनी येथील गणेश मंदिरात गदापूजनाच्या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक

मुंबईमध्ये प्रभादेवी, वरळी, माहीम, भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, जोगेश्वरी, गोरेगाव, नवी मुंबईत खारघर, तर पालघर जिल्ह्यात डहाणू आणि नालासोपारा येथील विविध मंदिरांत ‘गदापूजन’ करण्यात आले. सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुतिस्तोत्र, ‘श्री हनुमते नम:।’ हा सामूहिक नामजप, ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतिरायांचे गुण कसे आत्मसात करावेत ?’ याविषयीचे मार्गदर्शन या वेळी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.

गोरेगाव (प) येथील हनुमान मंदिरात गदापूजनाच्या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक

संपादकीय भूमिका 

गदापूजनाने होणारी शौर्यजागृती हिंदूंमध्ये रामराज्याच्या संघर्षासाठी आवश्यक ती ऊर्जा निर्माण करील !