अमरावतीची जागा भाजपच लढवेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

खासदार नवनीत राणा या ५ वर्षे भाजपसमवेत राहिल्या आहेत. लोकसभेत त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांची बाजू ठामपणे मांडली आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे भाजपची केंद्रीय  संसदीय समिती ठरवेल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर केले.

सिंधुदुर्गहून हैदराबादला जाणारे विमान अचानक रहित केल्याने प्रवाशांची असुविधा !

‘फ्लाय ९१’ या विमान आस्थापनाच्या सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमानसेवेला १८ मार्चला प्रारंभ झाला; मात्र १९ मार्चला ५० प्रवाशांना घेऊन हैदराबादला जाण्याच्या सिद्धतेत असलेल्या विमानाची फेरी रहित झाल्याचे अचानक घोषित करण्यात आल्याने या प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागला.

मुंबई महापालिकेसह प्रशासकीय अधिकार्‍यांचे स्थानांतर

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी!

शिरगाव गड (पालघर) येथे हिंदु जनजागृती समितीची ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने मावळ्यांनी हा गड पोर्तुगीजांकडून मिळवला होता. आरंभी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडाची स्वच्छता करण्यात आली. या वेळी गडावरील पालापाचोळा, प्लास्टिकचा कचरा उचलण्यात आला.

घोर अज्ञानी !

‘जे हिंदु धर्मावर टीका करतात, त्यांच्यासारखे अज्ञानी या जगात कुणी नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशा मनोवृत्तीच्या लोकांना देशाबाहेर हाकलले पाहिजे !

बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद या केशकर्तनालय चालवणार्‍या तरुणाने चाकूद्वारे गळे चिरून हत्या केली. घटनेनंतर पळून गेलेल्या साजिदला पोलिसांनी चकमकीत ठार केले.

संपादकीय : नरभक्षक साजिद आणि जावेद !

भारतात जिहादी मानसिकता पालटण्‍यासाठी कठोर निर्णय घेणे आता अपरिहार्य झाले आहे !

राजसत्ता आणि धर्मसत्ता !

उत्तरप्रदेशातील बरेली येथील अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाचे न्‍यायाधीश रवी कुमार दिवाकर हे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍या कार्याचे कौतुक करतांना म्‍हणाले, ‘‘जेव्‍हा एखादी धार्मिक व्‍यक्‍ती सत्तेच्‍या खुर्चीवर बसते, तेव्‍हा त्‍याचे चांगले परिणाम दिसून येतात.’’

मलंग म्‍हणजे मुसलमान फकीर नव्‍हे, तर ‘हिंदु योगी’ !

मलंग म्‍हणजे मुसलमान फकीर नव्‍हे ! भगवान दत्तात्रेयांनी अनेकांना मलंग रूपात दर्शन दिल्‍याचे उल्लेख वाचनात येतात आणि लोक चक्‍क मलंगचा अर्थ मुसलमान फकीर असाच सारख्‍या वेशामुळे गृहित धरतात.

भारतात लोकसभेच्‍या निवडणुकीसाठी कोणत्‍या वर्षी झाले किती टक्‍के मतदान ?

भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्‍हटले जाते. असे असूनही सरकारला अजूनही ‘मतदान करण्‍यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते.