अमरावतीची जागा भाजपच लढवेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच लढवेल. खासदार नवनीत राणा या ५ वर्षे भाजपसमवेत राहिल्या आहेत. लोकसभेत त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांची बाजू ठामपणे मांडली आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे भाजपची केंद्रीय  संसदीय समिती ठरवेल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर केले.

हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून समर्पित भावनेने काम करत आहेत. असे नेतृत्व मोठे झाले पाहिजे, असे म्हटले. जागावाटपाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुती प्रयत्नरत आहे. त्यामुळे जो मतदारसंघ ज्यांना मिळेल, तेथे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने प्रचार करेल, असे म्हटले.