भारतात लोकसभेच्‍या निवडणुकीसाठी कोणत्‍या वर्षी झाले किती टक्‍के मतदान ?

भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्‍हटले जाते. असे असूनही सरकारला अजूनही ‘मतदान करण्‍यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते. भारतात निवडणुका चालू झाल्‍यापासून मतदानाची टक्‍केवारी वाढत आहे. असे असले, तरी आपण अजून ७० टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाल्‍याचा पल्लाही गाठलेला नाही, हे धक्‍कादायक वास्‍तव आहे. वर्ष २०१९ मध्‍ये आतापर्यंतचे सर्वाधिक, म्‍हणजे ६७.४ टक्‍के मतदान झाले आहे. यंदाच्‍या निवडणुकीत जगभरातील सर्वाधिक म्‍हणजे ९६.८ कोटी मतदार मतदान करणार आहेत. आता कोणत्‍या वर्षी किती टक्‍के मतदान झाले, ते पाहूया.

(साभार : निवडणूक आयोग)