उत्तरप्रदेशातील बदायू येथील घटनेत साजिद याने २ लहान हिंदु मुलांचे गळे चिरून त्यांचे रक्त प्यायले. पोलिसांनी साजिद याला चकमकीत ठार केले आहे, तर त्याचा भाऊ जावेद पसार असून त्याचा शोध घेतला जात आहे. ही घटना मानवजातीला काळिमा फासणारी आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी साजिद याच्या केशकर्तनालयाची तोडफोड करून ते जाळून टाकले. नागरिकांचे म्हणणे होते, ‘साजिद आणि जावेद यांनाही जाळून टाका.’ अशा निर्घृण हत्येवर सामान्य लोकांची प्रतिक्रिया इतकी तीव्र असणे, हे अपेक्षितच आहे. यापूर्वी बलात्कार आणि नंतर हत्या करण्याच्या अनेक घटनांत नागरिकांनी आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातून ‘नागरिकांमध्ये अशा घटनांविषयी किती संताप असतो’, हे लक्षात येते. उत्तरप्रदेश पोलिसांनी वरील घटनेत साजिद याला चकमकीत ठार केल्याने जनतेचा संताप थोडासा अल्प झाला असला, तरी साजिदचा भाऊ जावेद यालाही ठार करण्याची मागणी ते करत आहेत. या हत्यांमागे कोणता उद्देश होता ? हे अद्याप उघड झालेले नाही. ज्या २ मुलांची हत्या करण्यात आली, त्यांच्या वडिलांनी ‘साजिद समवेत कोणतेही शत्रुत्व नव्हते’, असे म्हटले आहे. तसेच साजिद याने या कुटुंबाकडे ५ सहस्र रुपयांचे कर्ज मागितले होते आणि ते देण्यातही येणार होते. तरीही साजिदने या २ मुलांची हत्या केल्याने ‘ही हत्या का केली ?’, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उद्या पोलीस जावेदला पकडतील, तेव्हाच या हत्येमागील कारण उघड होईल. तरीही एखाद्याविषयी कुणाच्या मनात शत्रुत्व असले, तरी तो इतक्या विकृतपणे कुणाशी वागणार नाही. त्यामुळे ‘ही हत्या धार्मिकतेमुळे झाली आहे का ?’, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ती नाकारण्यात येऊ शकत नाही. जर तेच कारण असेल, तर ही अतिशय गंभीर गोष्ट ठरेल.
मनोवृत्ती पालटा !
अशा प्रकारे जर धर्माच्या आधारे हत्या होऊ लागल्या, तर हिंदूंना भीतीच्या सावटाखालीच वागावे लागेल. कोणत्याही मुसलमानावर विश्वास ठेवता येणार नाही. अशीतरी स्थिती अद्याप आलेली नाही. तरीही अशा घटना दिवसाआड घडत असतात, हेही नाकारता येणार नाही. ३ दिवसांपूर्वी बेंगळुरूमध्ये मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यामुळे मुसलमानांनी दुकानातील हिंदु कर्मचार्याला मारहाण केली, हे लक्षात घ्यायला हवे. अशा घटना निवडणुकीच्या काळात घडल्याने त्याचा राजकीयदृष्ट्या लाभ भाजपला होणार, असे म्हटले जात आहे, तर समाजवादी पक्षाने या घटनेसाठी राज्यातील भाजप सरकारवर कायदा आणि सुव्यवस्थेवरून टीका केली आहेे; मात्र साजिद आणि जावेद यांनी इतक्या निर्घृणपणे २ लहान मुलांच्या हत्या का केल्या ? यामागील मानसिकता काय होती ? यांवर मौनच बाळगले आहे. पोलिसांनी साजिद याला चकमकीत ठार केले आहे. एखाद्या गुन्हेगाराला एकवेळ ठार करणे सोपे असते; मात्र त्याची मनोवृत्ती पालटणे अवघड असते. अध्यात्मशास्त्रानुसार अशी व्यक्ती जेव्हा पुन्हा जन्म घेते, तेव्हा ती तिच्या त्याच मनोवृत्तीसमवेत जन्माला येते. जर तिच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत, तर पुन्हा ती अशाच प्रकारचे कृत्य करू शकते. याचा विचार करता गुन्हेगारांच्या मनोवृत्तीत पालट करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. सध्या गुन्हेगारांना शिक्षा होऊन ते अनेक वर्षे कारागृहात राहिले, तरी त्यांच्या मनोवृत्तीत पालट झाला, असे सराईत गुन्हेगारांच्या संदर्भात आढळून येत नाही. अनेकदा वय झाल्यामुळे असे गुन्हेगार पुन्हा गुन्हे करत नाहीत, तसेच ज्यांच्याकडून चुकून गुन्हा झाला आहे, ते पुन्हा असा गुन्हा करत नाहीत.
इच्छाशक्ती हवी !
हिंदूंची मनोवृत्ती मुळातच सहिष्णु आहे. तरीही त्यांच्याकडून गुन्हे घडत असतात. अनेक कुख्यात आणि सराईत गुन्हेगारही असतात; मात्र साजिद आणि जावेद यांच्यासारखी हत्या करून रक्त पिण्यासारखी त्यांची मानसिकता आढळून येत नाही. जिहादी आतंकवाद साजिदसारख्या मनोवृत्तीच्या लोकांमध्ये जगभरात दिसून येत आहे. बदायूच्या घटनेतून आता याकडे गांभीर्याने पाहून देशात यावर चर्चा झाली पाहिजे. अशा मानसिकतेला पालटण्यासाठी चीनप्रमाणे कुणी प्रयत्न करण्यास सांगितले, तर ते चुकीचे ठरू नये. चीनमध्ये उघूर मुसलमानांना त्यांच्यातील कट्टरतावाद नष्ट करण्यासह इस्लामी मानसिकतेतून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. १० लाख मुसलमानांना सुधारगृहात ठेवण्यात आले असून त्यांच्या सर्व धार्मिक कृतींवर, धार्मिक स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. असे चीनमध्ये घडू शकते आणि इस्लामी देशही त्यावर मौन बाळगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. भारतात असे काहीतरी करणे अशक्य आहे. तरीही मानसिकता पालटण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तशी इच्छाशक्ती सरकारांनी दाखवणे आवश्यक आहे. मुसलमानांच्या मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करणारे तसे करू देणार नाहीत, हेही तितकेच स्पष्ट आहे. त्यामुळे कायद्याच्या अंतर्गत राहून कठोर निर्णय घेऊन त्याची कार्यवाही करावी लागेल. २० कोटी लोकांच्या संदर्भात करावे लागेल, जे अशक्यप्रद वाटते. सीएए कायदा मुसलमानांच्या विरोधात नसतांना त्यावरून मुसलमानांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे त्यांच्याकडून आंदोलने करण्यात आली. त्यामुळे अशा प्रकारचे विरोध होणार, हे गृहितच धरावे लागेल. तरीही जे शक्य आहे, असे निर्णय घेण्याचे धाडस करावे लागेल. यात पहिल्यांदा मदरसे बंद करावे लागतील. सार्वजनिक ठिकाणी बुरखा, हिजाब आदी वेशभूषा करण्यावर बंदी घालावी लागेल. रस्त्यावरील नमाजपठण बंद करावे लागेल. अनधिकृत मशिदींवर कारवाई करावी लागेल. हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्यासाठी कायदा करून ती जागा पुन्हा हिंदूंना देण्याचा कायदा करावा लागेल. त्याच वेळी जिहादी मानसिकतेतून होणार्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा केली गेली पाहिजे. चारही बाजूंनी दबाव निर्माण झाल्यावर त्याचा स्फोट होऊ शकतो, याचा विचार करून तसे होण्यापूर्वीच तो मोडून काढण्याची उपाययोजना करावी लागणार आहे. अशा निर्णयांतून ‘आपण या देशात वेगळे आहोत आणि आपले कुणी वाकडे करू शकत नाही’, ही मानसिकता आणि निर्माण झालेला समज मोडून काढला की, त्याचा योग्य परिणाम होणार, यात शंका नाही. तसे करण्याची आवश्यकता आहे. असे धाडस दाखवले, तर बदायूच नव्हे, तर जिहादी आतंकवादालाही चाप बसेल, असेच जनतेला वाटेल.
भारतात जिहादी मानसिकता पालटण्यासाठी कठोर निर्णय घेणे आता अपरिहार्य झाले आहे ! |