‘बर्ड फ्ल्यू’च्या भीतीने लोकांनी चिकन खाणे सोडले !

शहरात रविवारी ३० टन चिकनची मागणी असते; मात्र काही दिवसांपूर्वी शहरातील काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याने ही मागणी घटली आहे. शहरात अंडी आणि चिकन यांची मागणी जवळपास निम्म्यावर आली आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

अजय सिंह सेंगर यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक नागरिकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे देशप्रेम जागृत होणे आवश्यक आहे. गांधीवादाला आदर्श समजणारे राजकीय पक्ष आणि जनता यांना गांधी यांचे खरे स्वरूप समजणे आवश्यक आहे

मुंबईतील मराठी मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न !

मुंबईमध्ये २० मे या दिवशी मतदान होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाला जाणार्‍यांना कसे थांबवायचे ? असा प्रश्न राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर आहे. या कालावधीत केवळ परप्रांतीय लोक मुंबईत असतात.

गोळीबार करणार्‍या दोघांचे जामीन आवेदन न्यायालयाने फेटाळले !

हिंगोली येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करणार्‍या दोघांचे जामीन आवेदन येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस्.एन्. माने यांनी २१ मार्च या दिवशी फेटाळून लावले आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक आदींचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश !

शस्त्र परवाना असलेल्या नागरिकांकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, बंदूक अशी शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. 

पुणे महापालिका नाल्यातील पाणी शुद्धीकरणाचा विचार करत आहे ! – महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले

नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांमधून ९६ एम्.एल्.डी. सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. ‘जायका’ प्रकल्पांतर्गत ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे चालू आहेत.

विदेशातही चालते मोदींची गॅरंटी (हमी) ! – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

मोदींची गॅरंटी (हमी) देशात, तसेच विदेशातही चालते. लोकांचा त्यांच्यावर विश्‍वास आहे. देशाविषयी अभिमानाची भावना पूर्वीपेक्षा अधिक आहे आणि लोकांचा विश्‍वासही वाढला आहे.

देहली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची अटक रोखण्याची याचिका फेटाळली

अंमलबजावणी संचालनालयासमोर (‘ईडी’समोर) उपस्थित रहाण्यास मी सिद्ध आहे. अन्वेषण यंत्रणेने ‘मला अटक करणार नाही’, याची निश्‍चिती दिली पाहिजे’, अशी मागणी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देहली उच्च न्यायालयात केली होती.

EXCLUSIVE : महाराष्ट्रात केवळ १० पक्षांना मिळणार राखीव चिन्ह : ३७६ पक्षांना लढवावी लागणार वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक !

शरद पवार यांच्या पक्षाची ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून मान्यताही गेली ! श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रात राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त असलेल्या केवळ १० पक्षांना लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघांत राखीव चिन्ह मिळू शकेल. या व्यतिरिक्त ३७६ अमान्यताप्राप्त; परंतु नोंदणी असलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक लढवायची असल्यास त्यांना मुक्तचिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे, म्हणजेच … Read more

वारंवार पुरवणी आरोपपत्रे सादर करणे, ही चुकीची प्रथा ! – सर्वोच्च न्यायालय

अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) वारंवार सादर  केली जात असलेली पुरवणी आरोपपत्रे ही चुकीची प्रथा आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ईडीला उद्देशून आदेश दिला आहे.