भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरण
हिंगोली – येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करणार्या दोघांचे जामीन आवेदन येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस्.एन्. माने यांनी २१ मार्च या दिवशी फेटाळून लावले आहे.
१ ऑगस्ट २०२३ या दिवशी जिल्हा परिषदेच्या आवारात चव्हाण यांच्यावर एका तरुणाने समोरच्या बाजूने, तर दुसर्या तरुणाने मागच्या बाजूने गोळीबार केला. चव्हाण यांना पाठीत गोळी लागल्याने ते घायाळ झाले होते. प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले होते. तेथे त्यांची प्रकृती सुधारली.
पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली होती. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अक्षय इंदोरीया, ओम पवार, सत्यम देशमुख, सतीष कुशवाह, अजिंक्य नाईक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी सर्वांना अटक केली असून ते कारागृहात आहेत.