नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयासमोर (‘ईडी’समोर) उपस्थित रहाण्यास मी सिद्ध आहे. अन्वेषण यंत्रणेने ‘मला अटक करणार नाही’, याची निश्चिती दिली पाहिजे’, अशी मागणी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देहली उच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. उच्च न्यायालयाने सांगितले, ‘अटकेविषयी कोणतीही अंतरिम सुरक्षा दिली जाऊ शकत नाही.’ उच्च न्यायालयाने या प्रकरणी ईडीला उत्तर देण्यास आणि नवीन अंतरिम याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणी २२ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
सौजन्य India Today
मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणात केजरीवाल यांना २ नोव्हेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२४ या काळात चौकशीसाठी उपस्थित रहाण्यासाठी ईडीने ८ समन्स बजावले होते; मात्र ते एकदाही उपस्थित राहिले नव्हते. २० मार्चला केजरीवाल यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात म्हटले हेते की, ईडीने आपचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. अन्वेषण यंत्रणा केजरीवाल यांनाही अटक करू शकते.