नागपूर – शहरात रविवारी ३० टन चिकनची मागणी असते; मात्र काही दिवसांपूर्वी शहरातील काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याने ही मागणी घटली आहे. शहरात अंडी आणि चिकन यांची मागणी जवळपास निम्म्यावर आली आहे. नुकत्याच कुक्कुटपालन केंद्रातील साडेआठ सहस्र कोंबड्या मारण्यात आल्या, तसेच १७ सहस्र अंडी आणि जवळपास साडेपाच सहस्र किलो पक्षीखाद्यही नष्ट करण्यात आले होते.
सध्या कुठेही बर्ड फ्ल्यूचा उद्रेक नसून चिकन, तसेच अंडी खाणे सुरक्षित असल्याचे जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने सांगितले आहे.