लोय पिंपळोद (नंदुरबार) येथे चारचाकीने ५ जणांचा चिरडले; १ गंभीर
तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला ३ मोटारसायकलसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडल्याने ५ जणांचा मृत्यू, तर १ जण गंभीर घायाळ झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला ३ मोटारसायकलसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडल्याने ५ जणांचा मृत्यू, तर १ जण गंभीर घायाळ झाल्याची घटना घडली.
सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देणार्या टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई अमेरिकेत लपून बसल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे यांना साहाय्य करण्यावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदा सरवणकर यांची समजूत काढतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केले.
नागरिकांना वक्फ बोर्डाच्या दाव्याच्या विरोधात का लढावे लागत आहे ? केंद्र सरकारने वक्फ बोर्ड आणि कायदा रहित करणे, याच यावरील एकमेव उपाय आहे !
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा अजितदादांवर टीका केली आहे. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे म्हणाल्या
नवी मुंबई येथे मद्याच्या नशेत एका व्यक्तीने ‘लिव्ह इन पार्टनर’ची हत्या केल्याची घटना घडली आहे. वर्ष २००८ मध्ये हा आरोपी त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणात कारागृहात गेला होता. त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली होती.
पुणे शहरात लूटमार करणार्या चोरट्याल्या विश्रामबाग पोलिसांनी कह्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्तुले, ४ काडतुसे जप्त केली. शास्त्री रस्ता परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.
नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या २ दंगलींचा आढावा घेतला तरी कळेल की, या दंगली सुनियोजित होत्या. विधानसभेच्या निवडणुकीतही असा प्रकार केला जाणार आहे.
निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६.३० पर्यंत कोणत्याही प्रकारच्या ‘एक्झिट पोल’चे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमाद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू रहाणार आहे.